प्रोग्रामिंग - ओळख¶
प्रोग्रामिंग म्हणजे नक्की काय? आपण एक सोपे उदाहरण बघू. एका बँकेत 12,000 जमाखाती आहेत. प्रत्येक खात्यातील ठेवलेल्या रक्मेवर दरमहा व्याज दिले जाते. समजा प्रत्येक खात्याच व्याज मोजण्यास 2 मिनिट लागतात. सगळी खाती तपासायला त्यामुळे सादाहरण 400 तास लागतील. एका संगणकाला हेच काम करायला काही मिनिटं लागतील. हे काम नक्की कसे करायचे हे मात्र संगणकाला सांगावे लागेल. या प्रक्रियेलाच प्रोग्रामिंग म्हणतात. प्रोग्रॅम म्हणज रीतसर क्रमांकानुसार आयोजित केलेला एक सूचनांचा संग्रह.
हा संग्रह तयार करायचे अनेक मार्ग आहेत. यासाठी अनेक भाषांचा वापर केला जातो. अशीच एक भाषा आहे Python (उ. पायथन). पायथन भाषा ही इंग्रजी भाषेवर आधारित आहे. आपण इथे मराठी भाषेवर आधारित पयथनच्या एका उपसंचाची ओळख करून घेणार आहोत. यामुळे कमीत कमी इंग्रजी भाषेचा वापर करून आपण संगणक नक्की कसे चालतात आणि पायथन भाषा इतकी महत्वाची आणि प्रचलित का आहे हे बघणार आहोत.