अंतर्गत क्रिया¶
पायथन भाषेत अनेक अंतर्गत क्रिया आहेत ज्या नेह्मी उपलब्ध अस्तात. त्यातील काही मराठी आवृत्तीत देखिल उपलब्ध आहेत. त्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे.
अंक(क, *आधार)
दिलेल्या आगत ‘क’ याचे पूर्णांकात परिवरतन करणे. ‘क’ ही शब्दमाळ असू शकते अथवा ‘क’ हा तरबिंदू अंक असू शकतो. ‘आधार’ हे आगत बाध्यकारक नाही. हे नमूद केले नस्ल्यास आधार म्हणून 10 गृहित घेतले जातात.
>>> अंक(2.5)
2
>>> अंक('123')
123
>>> अंक('10111001', 2)
185
>>> अंक('FF', 16)
255
अक्षर(क)
दिलेल्या अंकाचे यूनिकोड पद्धतीनुसार अक्षरात परिवर्तन करणे आणि अक्षर परत करणे.
>>> अक्षर(2309)
'अ'
>>> अक्षर(97)
'a'
>>> अक्षर(66)
'B'
अक्षरमूल्य(क)
दिलेल्या अक्षराचे यूनिकोड पद्धतीनुसार अंकात परिवर्तन करणे आणि अंक परत करणे.
>>> अक्षरमूल्य('क')
2325
>>> अक्षरमूल्य('A')
65
>>> अक्षरमूल्य('?')
63
अव्यय(क)
दिलेल्या वस्तुच्या गुणधर्मांची यादी परत करणे.
>>> आयात गणित उर्फ ग
>>> अव्यय(ग)
['अंश', 'आकॉस', 'आकॉसह', 'आटॅन', 'आटॅन2', 'आटॅनह', 'आसाईन', 'आसाईनह', 'ई', 'कॉस', 'कॉसह', 'कोज्या', 'गुणनखंड', 'गॅमा', 'घनमूल', 'घातांक', 'घातांक2', 'छप्पर', 'जमीन', 'ज्या', 'टाऊ', 'टॅन', 'टॅनह', 'पाय', 'मसावि', 'मूळ', 'रेडियन', 'लगॅमा', 'लसावि', 'लॉग', 'लॉग10', 'लॉग2', 'समूळ', 'साईन', 'साईनह']
अष्टम(क)
दिलेल्या पूर्णांक ‘क’ याचे अष्टम म्हणजे 8 चा आधार अस्लेल्या अंकात परिवर्तन करणे. अष्टम अंकांची सुरूवात ‘0o’ (शून्य आणि ईंग्रजी अक्षर ‘o’) आशी केलि जाते.
>>> अष्टम(22)
'0o26'
>>> अष्टम(40)
'0o50'
आगत(विनंती)
आगत क्रियेसाठी ‘विनंती’ बाध्यकारक नाही. आगत हे पुढल्या ओळीवर विनंती प्रस्तुत करत आणि मिळालेल उत्तर शब्दमाळ म्हणून साठवत.
>>> क = आगत('क साठी मूल्य द्या : ')
क साठी मूल्य द्या : 25
>>> क
'25'
>>> प = आगत('प साठी मूल्य द्या : ')
प साठी मूल्य द्या : नमस्कार
>>> प
'नमस्कार'
उघड(फाईलनाव, पद्धत, कोडपद्धत)
“फाईलनाव” नावाची फाईल दिलेल्या पद्धतीने उघडणे. पद्धत ठरवते की फाईल फक्त वाचण्यासाठी उघडायची आहे का फाईल मधील मजकूर बदलायचा आहे.
पद्धत ही खलील अक्षरांनी नमूद केली जाते.
अक्षर |
अर्थ |
|---|---|
‘व’ |
वाचणे |
‘न’ |
नवीन |
‘ल’ |
लिहीणे |
‘ज’ |
जोडणे |
‘ब’ |
बायनरी |
‘+’ |
बदल |
पद्धत हे आगत वगळल्यास फाईल ही फक्त वाचता येते.
‘ल’ पद्धत असलेली फाईल ही सुरुवातीला रिकामी केली जाते. ही फईल वाचल्यास काही परत केले जात नाही. ‘न’ वापरल्यास एक नवीन फाईल तयार केली जाते. जर त्या नावाची फाईल आधीच हजर असेल तर ‘फाईलहजरदोष’ परत केला जातो. ‘ज’ चा वापर करून हजर असलेल्या फाईलच्या शेवटी नवा मजकूर जोडता येतो. ‘ब’ चा वापर केल्यास फाईलीमधे परस्पर बाईट रुपात मजकूर लिहिता येतो. ‘+’ चा वापर ‘व’ सोबत केल्यास फाईल वाचता तसेच लिहीता येते.
>>> फ = उघड('प्रयोग.ट', 'न')
>>> फ.लिहीणे('नमस्कार')
>>> फ.बंद()
>>> फ = उघड('प्रयोग.ट', 'न')
सावधान : फाईलहजरदोष
>>> फ = उघड('प्रयोग.ट', 'व+')
उलट(क्रम)
दिलेल्या क्रम आधारीत वस्तूचा क्रम उलटायला एक नवीन निर्माता परत करणे.
>>> क = [1,2,3]
>>> ख = उलट(क)
>>> यादी(ख)
[3, 2, 1]
इथे ‘क’ ही एक यादी आहे. ‘ख’ हा एक निर्माता आहे. ‘ख’ वर ‘यादी’ ही क्रिया वापरून आपण एक नवीन यादी तयार करतो जीचा क्रम हा ‘क’ या यादीच्या क्रमाच्या उलट आहे.
एकयंत्र(क्रम)
दिलेल्या वस्तूचे एकयंत्र तयार करणे. एकयंत्राचा फायदा असा आहे की त्यातील संख्या एक-एक करून वाचता येतात व त्यांच्यावर क्रिया करता येतात.
>>> क = [1,2,3]
>>> ख = एकयंत्र(क)
>>> पुढील(ख, -1)
1
>>> पुढील(ख, -1)
2
कमाल(यादी)
कमाल(क, ख)
कमाल ही क्रिया वर दिल्याप्रमाणे दोन प्रकारे वापरता येते. आगत म्हणून एक यादी दिल्यास, त्या यादीतील कमाल मूल्य परत केले जाते. आगत म्हणून दोन मूल्य दिल्यास त्यांच्यातील कमाल मूल्य परत केले जाते.
>>> कमाल([1,9,4,2,8,5])
9
>>> कमाल(['त', 'प', 'ड', 'स', 'म'])
'स'
>>> कमाल(23, 11.7)
23
>>> कमाल(['कि', 'कै', 'को' ])
'को'
किमान(यादी)
किमान(क, ख)
किमान ही क्रिया वर दिल्याप्रमाणे दोन प्रकारे वापरता येते. आगत म्हणून एक यादी दिल्यास, त्या यादीतील किमान मूल्य परत केले जाते. आगत म्हणून दोन मूल्य दिल्यास त्यांच्यातील किमान मूल्य परत केले जाते.
>>> किमान([1,9,4,2,8,5])
1
>>> किमान(['त', 'प', 'ड', 'स', 'म'])
'ड'
>>> किमान(23, 11.7)
11.7
>>> किमान(['कि', 'कै', 'को' ])
'कि'
केवल(क)
दिलेल्या संख्येचे केवलमूल्य परत करणे. ‘क’ ह अंक अथवा तरबिंदू असू शकतो. ‘क’ ही संख्या संमिश्र असल्यास तिचा मापांक परत केला जातो.
>>> केवल(16)
16
>>> केवल(-7)
7
>>> केवल(3+4j)
5.0
कोश()
कोश ही क्रिया वापरून एक नवीन कोश तयार करता येतो.
क्रमण(यादी, *घट)
क्रमण ही क्रिया वापरून दिलेल्या यादीतील घटक हे वाढत्या क्रमवारीत लावले जातात. क्रमण या क्रियेचे दुसरे आगत ‘घट’ ठरवते की यादीतील घटक हे वाढत्या क्रमवारीत की घटत्या क्रमवारीत लावायचे आहेत. घट हे आगत बाध्यकारक नाही आहे. घटाचे मूल्य 0 असल्यास क्रमवारी ही वाढती असते अथवा क्रमवारी ही घटणारी असते.
>>> क = [1,9,4,2,8,5]
>>> क्रमण(क)
[1, 2, 4, 5, 8, 9]
>>> क्रमण(क, 0)
[1, 2, 4, 5, 8, 9]
>>> क्रमण(क, 1)
[9, 8, 5, 4, 2, 1]
गाळणे(क्रिया, यादी)
गाळणे ही क्रिया वापरून दिलेल्या यादीतील घटक दिलेल्या क्रियेप्रमाणे गाळता येतात. गाळणे ही क्रिया एक निर्माता परत करते. त्याचा वापर करून एक नवीन यादी तयार करता येते.
>>> जाहीर अधिक4(क):
+++ जर क > 4:
+++ परत सत्य
+++ परत असत्य
+++
>>>
>>> संख्य = [1,2,3,4,5,6,7,8,9]
>>>
>>> ख = गाळणे(अधिक4, संख्या)
>>>
>>> यादी(ख)
[5, 6, 7, 8, 9, 10]
वरील उदाहरणात आपण आधी एक क्रिया जाहीर केली आहे. नंतर त्या क्रियेचा वापर करून आपण दिलेल्या यादीतील अंक गाळले आहेत.
घात(आधार, घातमूल्य, मॉड)
घात ही क्रिया वापरून दिलेल्या आधार अंकाचा घात मोजता येतो.
>>> घात(4, 2)
16
>>> घात(25, 0.5)
5.0
इथे एक तिसरे आगत आहे जे बाध्यकारक नाही आहे. हे तिसरे आगत दिल्यास उत्तर हे घातांकाचे मॉड ने भागाकार केल्यावर उरलेला भाग असतो.
>>> घात(4, 2, 5)
1
चल()
वापरात असलेल्या मराठी भाषेतील सर्व चलांचा कोश परत करणे.
>>> क = 1
>>> ख = 2
>>> ग = क + ख
>>> चल()
{'क': 1, 'ख': 2, 'ग': 3}
छापा(*वस्तू)
छापा ही क्रिया वापरून दिलेल्या वस्तू छापता येतात.
>>> क = [1,2,3,4]
>>> ख = 'नमस्कार'
>>> प = चल()
>>> छापा(क, ख, प)
[1, 2, 3, 4] नमस्कार {'क': [1, 2, 3, 4], 'ख': 'नमस्कार', 'ग': 3}
तरबिंदू(क)
दिलेल्या शब्दमाळेच तरबिंदू अंकामध्ये परिवर्तन करणे. असे तरबिंदू अंक त्वरित वापरता येतात जसं खालचं उदाहरण दाखवत.
>>> तरबिंदू('1e-3')
0.001
>>> तरबिंदू('+1.25')
1.25
>>> तरबिंदू('+1.25') * 8
10.0
तुकडा(क)
ही क्रिया वापरून एखाद्या यादी किंवा अक्षरमाळेचा तुकडा वेगळा करता येतो. यासाठी तुकड्याची सुरुवात, अंत तसेच घटकांमधले अंतर नमूद करता येते.
>>> क = [0,1,2,3,4,5,6,7,8,9]
>>> ख = तुकडा(3,6)
>>> क[ख]
[3, 4, 5]
>>> ख = तुकडा(3,8,2)
>>> क[ख]
[3, 5, 7]
बिन(क)
द्वैत(क)
ही क्रिया वापरून दिलेल्या संख्येचे बायनरी अथवा द्वैत संख्येत परिवर्तन करता येते. द्वैत संख्या फक्त 0 आणि 1 हे दोनच आकडे वापरून लिहिता येतात. या संख्यांच्या सुरुवातीला शून्य आणि इंग्रजी अक्षर b लिहिले जातात.
>>> द्वैत(7)
'0b111'
>>> बिन(7)
'0b111'
नकाशा(आगतक्रिया, क, *ख)
नकाशा या क्रियेला दोन बाध्यकारक आगत आहेत. पहिले आगत आहे एक क्रिया आणि दुसरे आगत आहे एखादी यादी अथवा शब्दमाळ. या क्रियेला अजून आगत देखील देता येतात पण ती बाध्यकारक नाहीत. इथे आगतक्रिया ही दिलेल्या पुढील वस्तूंमधील प्रत्येक घटकावर वापरली जाते व एक नवीन निर्माता परत केला जातो.
>>> जाहीर अधिक(क, ख):
+++ परत क + ख
+++
>>> त = [2,3,4,5,6,7]
>>> थ = [9,8,7,6,5,4]
>>> प = नकाशा(अधिक, त, थ)
>>> यादी(प)
[11, 11, 11, 11, 11, 11]
पत्ता(क)
दिलेल्या वस्तूचा पत्ता परत करणे. पत्ता म्हणजे मेमरी मध्ये जिथे ही वस्तू साठवली आहे ती जागा.
>>> त = [2,3,4,5,6,7]
>>> पत्ता(त)
2581959456384
परास(शेवट)
परास(सुरू, शेवट, अंतर)
परास ही क्रिया वापरून एक नवीन निर्माता तयार करता येतो. हा निर्माता सुरू आणि शेवट या दोन संख्यांमधील सर्व संख्यांची एक यादी तयार करतो. हवे असल्यास संख्यांमध्ये एक व्यतिरिक्त दुसरे अंतरही ठेवता येते.
>>> क = परास(5)
>>> यादी(क)
[0, 1, 2, 3, 4]
>>> क = परास(2,5)
>>> यादी(क)
[2, 3, 4]
>>> क = परास(0,14,3)
>>> यादी(क)
[0, 3, 6, 9, 12]
>>> क = परास(10, 1)
>>> यादी(क)
[]
पुढील(एकयंत्र, अंत)
पुढील ही क्रिया वापरून एकयंत्रातील पुढील मूल्य परत केले जाते. यंत्र रिकाम असल्यास अंत म्हणून दिलेल मूल्य परत केल जातं.
>>> क = [1,2,3]
>>> ख = एकयंत्र(क)
>>> पुढील(ख, -1)
1
>>> पुढील(ख, -1)
2
>>> पुढील(ख, -1)
3
>>> पुढील(ख, -1)
-1
प्रकार(वस्तू)
प्रकार ही क्रिया वापरून दिलेल्या वस्तूचा वर्ग ओळखता येतो. वर्गाचा मराठी भाषेत अनुवाद नसल्यास त्याचे मूळ इंग्रजी नाव दाखवले जाते.
>>> क = [1,2,3]
>>> प्रकार(क)
<वर्ग यादी>
>>> को = {1:'क', 2:'ख'}
>>> प्रकार(को)
<वर्ग कोश>
>>> स = {1,2,3,4}
>>> प्रकार(स)
<वर्ग संच>
बाईट(शब्दमाळ, कोडपद्धत)
बाईट ही क्रिया वापरून दिलेल्या शब्दमाळेच बाईट मध्ये परिवर्तन करता येते. यासाठी एक कोडपद्धत नमूद करणे बाध्यकारक आहे. बाईट या वस्तूप्रकारात बदल करता येत नाहीत. असे करायचे असल्यास आपण बाईटविन्यास ही वस्तू वापरतो.
>>> क = बाईट('कखग', 'utf-8')
>>> क
b'\xe0\xa4\x95\xe0\xa4\x96\xe0\xa4\x97'
>>> क[0]
224
>>> क[0] = 223
सावधान : वस्तूप्रकारदोष
बाईटविन्यास(शब्दमाळ, कोडपद्धत)
बाईटविन्यास ही क्रिया वापरून दिलेल्या शब्दमाळेच बाईटविन्यासात परिवर्तन करता येते. यासाठी एक कोडपद्धत नमूद करणे बाध्यकारक आहे. बाईटविन्यास या वस्तूप्रकारात बदल करता येतात.
>>> क = बाईटविन्यास('कखग', 'utf-8')
>>> क
bytearray(b'\xe0\xa4\x95\xe0\xa4\x96\xe0\xa4\x97')
>>> क[0]
224
>>> क[0] = 223
>>> क
bytearray(b'\xdf\xa4\x95\xe0\xa4\x96\xe0\xa4\x97')
बेरीज(क)
बेरीज ही क्रिया वापरून दिलेल्या यादीतील सर्व संख्यांच बेरीज करता येतं.
>>> क = [3,4,5,6,7]
>>> बेरीज(क)
25
माळ(क, कोडपद्धत)
माळ ही क्रिया वापरून दिलेल्या बाईट अथवा बाईटविन्यास वस्तूचे शब्दमाळेत परिवर्तन करता येतं. यासाठी एक कोडपद्धत नमूद करणे बाध्यकारक आहे.
>>> क = बाईटविन्यास('कखग', 'utf-8')
>>> माळ(क, 'utf-8')
'कखग'
यादी(क)
दिलेल्या निर्मात्याचे यादीमध्ये परिवर्तन करणे.
>>> क = परास(5)
>>> यादी(क)
[0, 1, 2, 3, 4]
रचना(मूल्य, पद्धत)
ही क्रिया वापरून दिलेला अंक किंवा दिलेला तरबिंदू यांचे दिलेली पद्धत वापरून शब्दमाळी मध्ये परिवर्तन करता येते. पद्धत एक शब्दमाळ म्हणून नमूद केली जाते. पद्धत ही खाली दिलेल्या तीन घटकांनी तयार करता येते.
.(अंक) |
अंक हे मूल्य दशांशानंतरची लांबी ठरवते. |
e |
‘e’ - हे चिन्ह वापरून अंक हा वैज्ञानिक पद्धतीने दाखवता येतो. |
f |
‘f’ - हे चिन्ह वापरून अंकाचे तरबिंदू अंकामध्ये परिवर्तन करता येते. |
वरील तीन पैकी एक किंवा दोन घटक एकत्र घेऊन अनेक प्रकारच्या शब्दमाळा तयार करता येतात.
>>> आयात गणित उर्फ ग
>>> क = ग.पाय
>>> क
3.141592653589793
>>> रचना(क, '.3f')
'3.142'
>>> रचना(क, '.3e')
'3.142e+00'
>>> क = 23*100*100
>>> क
230000
>>> रचना(क, '.3f')
'230000.000'
>>> रचना(क, '.3e')
'2.300e+05'
>>> ख = क + 4567
>>> ख
234567
>>> रचना(ख , '.3e')
'2.346e+05'
लांबी(क)
दिलेल्या वस्तूतील घटकांची संख्या परत करणे. याला त्या वस्तूची लांबी असे म्हणतात.
>>> क = [3,4,5,6,7]
>>> लांबी(क)
5
वस्तू()
ही क्रिया वापरून एक रिकामी वस्तू तयार करता येते. ही वस्तू सगळ्यात सोप्या वर्गाची असते व तिला कोणतेही अतिरिक्त गुणधर्म नस्तात.
>>> क = वस्तू()
षोडश(क)
दिलेल्या पूर्णांक ‘क’ याचे षोडश म्हणजे 16 चा आधार अस्लेल्या अंकात परिवर्तन करणे. षोडश अंकांची सुरूवात ‘0x’ (शून्य आणि ईंग्रजी अक्षर ‘x’) आशी केली जाते.
>>> षोडश(50)
'0x32'
संच(क)
दिलेल्या वस्तूचे संचात परिवर्तन करणे. असे केल्यास त्यावर संचांच्या क्रिया वापरता येतात.
>>> क = संच([1,2,3,4,5])
>>> क
{1, 2, 3, 4, 5}
>>> ख = संच([3,4,5,6,7])
>>> ख
{3, 4, 5, 6, 7}
>>> क._छेद(ख)
{3, 4, 5}
संमिश्र(क)
संमिश्र ही क्रिया वापरून दिलेल्या शब्दमाळेचे संमिश्र संख्येत परिवर्तन करता येत. या संख्यांवर नंतर संमिश्र बीजगणित वापरता येत.
>>> क = संमिश्र('1+1j')
>>> ख = संमिश्र('-1+2j')
>>> क
(1+1j)
>>> ख
(-1+2j)
>>> क + ख
3j
>>> क * ख
(-3+1j)
सरकबंद(*क)
ही क्रिया वापरून दिलेल्या याद्यांमधील पहिल्या, दुसऱ्या इत्यादी संख्यांच्या टूपलांची यादी तयार करता येते. ही क्रिया एक निर्माता परत करते.
>>> क = [1,2,3]
>>> ख = ['प', 'फ', 'ब']
>>> त = सरकबंद(क, ख)
>>> यादी(त)
[(1, 'प'), (2, 'फ'), (3, 'ब')]
स्थूलांकन(क, लांबी)
दिलेल्या संख्येचे दिलेल्या लांबीपर्यंत स्थूलांकन करणे. लांबी वगळल्यास संख्येच्या जवळचा पूर्णांक परत केला जातो.
>>> आयात गणित उर्फ ग
>>> ग.पाय
3.141592653589793
>>> स्थूलांकन(ग.पाय, 4)
3.1416
>>> स्थूलांकन(ग.पाय)
3