अंतर्गत वस्तूप्रकार

पायथन भाषेत अनेक अंतर्गत वस्तूप्रकार आहेत. त्यातील काही मराठी आवृत्तीत देखिल उपलब्ध आहेत. त्यांचे विवरण पुढीलप्रमाणे आहे.

संख्यांवर आधारित वस्तूप्रकार - पूर्णांक,तरबिंदू आणि संमिश्र

पूर्णांक, तरबिंदू तसेच संमिश्र या प्रकारच्या संख्या वापरून गणिताशी संबंध असलेल्या क्रिया करता येतात. पायथन भाषेत मिश्र क्रिया करता येतात, म्हणजेच पूर्णांक आणि तरबिंदू यांचे बेरीज किंवा संमिश्रअंक आणि पूर्णांक यांच्यातील फरक इत्यादी क्रिया करता येतात.

क्रमवारी असलेले वस्तूप्रकार - यादी, टूपल आणि परास

क्रमवारी असलेल्या वस्तूंचे दोन प्रकार आहेत. यातील काही वस्तू नित्य असतात, म्हणजेच जाहीर केल्यावर त्यांची मूल्य बदलता येत नाहीत. यात टूपल हे याचं एक उदाहरण आहे. दुसरा प्रकार आहे अनित्य ह्या बदलता येणाऱ्या वस्तूंचा. ह्यात यादी हे एक उदाहरण आहे.

अनेक वस्तू प्रकारांच्या स्वतःच्या अंतर्गत क्रिया असतात. यात आपण क्रम आधारित वस्तू प्रकारांच्या काही सामान्य अंतर्गत क्रिया पाहणार आहोत.

क्रमांक(क)

ही क्रिया वापरून दिलेल्या आगताचा वस्तूमधील क्रमांक बघता येतो.

>>> क = (1,3,5,2,7,4,9)
>>> क.क्रमांक(5)
2
>>> ख = परास(3, 10)
>>> ख.क्रमांक(6)
3
>>> ख.क्रमांक(2)
सावधान : मूल्यदोष

गणना(क)

ही क्रिया वापरून दिलेल्या आगताची वस्तू मधील गणना करता येते.

>>> क = (1, 3, 5, 2, 7, 4, 9, 3, 4, 3, 6)
>>> क.गणना(4)
2
>>> क.गणना(3)
3
>>> क.गणना(5)
1
>>> क.गणना(8)
0

अनित्य वस्तूंच्या विशेष अंतर्गत क्रिया

याव्यतिरिक्त अनित्य वस्तू प्रकारांना काही विशेष अंतर्गत क्रिया असतात. आता आपण या अंतर्गत क्रियांची यादी पाहू.

अधिक(क)

ही क्रिया वापरून दिलेल्या वस्तूच्या शेवटी एक नवीन मूल्य जोडता येते.

>>> क = [1,2,3]
>>> क.अधिक(4)
>>> क
[1, 2, 3, 4]

नोंदणे(जागा, मूल्य)

ही क्रिया वापरून वस्तूमध्ये दिलेल्या जागेवर नवे मूल्य नोंदता येते.

>>> क = [1,2,4]
>>> क.नोंदणे(2,3)
>>> क
[1, 2, 3, 4]

काढणे(मूल्य)

ही क्रिया वापरून दिलेले आगत वस्तूमध्ये असल्यास ते काढून टाकता येते. दिलेले आगत वस्तूमध्ये नसल्यास मूल्यदोष दाखवला जातो.

>>> क = [1,2,3]
>>> क.काढणे(3)
>>> क
[1, 2]
>>> क.काढणे(4)
सावधान : मूल्यदोष

पॉप()

ही क्रिया वापरून दिलेल्या वस्तूतील शेवटचे मूल्य काढून टाकले जाते व परत केले जाते. या क्रियेला एखादा क्रम आगत केल्यास त्या क्रमावरील मूल्य काढले जाते.

>>> क = [1,1,2,3,5,8]
>>> क.पॉप()
8
>>> क
[1, 1, 2, 3, 5]
>>> क.पॉप()
5
>>> क
[1, 1, 2, 3]
>>> क.पॉप(1)
1
>>> क
[1, 2, 3]

साफ()

ही क्रिया वापरून दिलेली वस्तू रिकामी करता येते.

>>> क = [1,1,2,3,5,8]
>>> क.साफ()
>>> क
[]

उलट()

ही क्रिया वापरून दिलेल्या वस्तूतील घटकांची क्रमवारी उलट करता येते.

>>> क = [1, 2, 3, 3, 4, 5, 6, 7, 9]
>>> क.उलट()
>>> क
[9, 7, 6, 5, 4, 3, 3, 2, 1]

प्रत()

दिलेल्या वस्तूची नवीन प्रत तयार करणे. खालील उदाहरण प्रत ही क्रिया वापरायचे फायदे दाखवते.

>>> क = [1,2,3,4]
>>> ख = क
>>> ख
[1, 2, 3, 4]
>>> क.पॉप()
4
>>> क
[1, 2, 3]
>>> ख
[1, 2, 3]
>>> क = [1,2,3,4]
>>> ख = क.प्रत()
>>> क.पॉप()
4
>>> क
[1, 2, 3]
>>> ख
[1, 2, 3, 4]

यादी वस्तूप्रकाराची विशेष अंतर्गत क्रिया

क्रमवारी()

ही क्रिया वापरून यादीतील घटक वाढत्या क्रमवारीत लावता येतात.

>>> क = [3, 5, 9, 2, 7, 4, 1, 6, 3]
>>> क.क्रमवारी()
>>> क
[1, 2, 3, 3, 4, 5, 6, 7, 9]

परास या वस्तूप्रकाराचे विशेष गुणधर्म

सुरू

परास जिथे सुरू होते ते मूल्य.

शेवट

परास जिथे संपते ते मूल्य.

अंतर

दोन घटकांमधील अंतर.

>>> क = परास(2, 16, 3)
>>> क.सुरू
2
>>> क.शेवट
16
>>> क.अंतर
3

अक्षरांवर आधारित वस्तूप्रकार - शब्दमाळ

शब्दमाळांचा वापर हा वापरकर्त्याशी संवाद साधायला केला जातो. शब्दमाळा ह्या फाईल मध्ये मजकूर लिहिण्यासाठी तसेच त्या मजकुरावरती विविध क्रिया करण्यासाठी वापरल्या जातात. शब्दमाळांच्या अनेक अंतर्गत क्रिया आहेत. त्यातील काही पुढील प्रमाणे आहेत.

अंत(क)

दिलेल्या शब्दमाळेचा अंत एखाद्या अक्षराने किंवा शब्दमाळाने होतो का हे तपासणे.

>>> म = 'नमस्कार'
>>> म.अंत('न')
असत्य
>>> म.अंत('र')
सत्य
>>> म.अंत('कार')
सत्य

सुरुवात(क)

दिलेल्या शब्दमाळेची सुरुवात एखाद्या अक्षराने किंवा शब्दमाळाने होते का हे तपासणे.

>>> म = 'नमस्कार'
>>> म.सुरूवात('न')
सत्य
>>> म.सुरूवात('नम')
सत्य
>>> म.सुरूवात('नमा')
असत्य

शोध(क)

दिलेली शब्दमाळ एखाद्या मोठ्या शब्दमाळेचा भाग आहे का हे तपासणे. शोधलेली शब्दमाळ सापडल्यास त्याची जागा परत केली जाते व न सापडल्यास -1 हे मूल्य परत केले जाते.

>>> म = 'महाराष्ट्र माझा'
>>> म.शोध('हा')
1
>>> म.शोध('राष्ट्र')
3
>>> म.शोध('क')
-1

जोड(शब्द)

दिलेली यादी अथवा दिलेले टूपल यातील शब्दमाळांना दिलेल्या शब्दाला मध्ये वापरून जोडून नवीन शब्दमाळ तयार करणे.

>>> य = ['एक' , 'दोन', 'तीन']
>>> 'शब्द'.जोड(य)
'एकशब्ददोनशब्दतीन'
>>> '--'.जोड(य)
'एक--दोन--तीन'

फाळणी(शब्द)

दिलेल्या शब्दमाळेची दिलेला शब्द अथवा शब्दमाळ शोधून तीन भागात फाळणी करणे.

>>> म = 'शरद घरी जा'
>>> म.फाळणी('घरी')
('शरद ', 'घरी', ' जा')
>>> म.फाळणी('घ')
('शरद ', 'घ', 'री जा')

बदली(जुना, नवीन)

शब्दमाळेत दिलेला शब्द अथवा शब्दमाळ शोधून तिथे नवीन शब्द अथवा शब्दमाळेची बदली करणे.

>>> म = 'शरद घरी जा'
>>> म.बदली('घरी', 'बाजारात')
'शरद बाजारात जा'

तोड(विभाजक)

शब्दमाळेचे दिलेल्या शब्द अथवा अक्षरावर तुकडे करणे. अक्षर अथवा शब्द न दिल्यास शब्दमाळ ही प्रत्येक रिकाम्या जागेवर तोडली जाते.

>>> म = "शरद घरी आहे, तो नंतर बाहेर जाईल"
>>> म.तोड()
['शरद', 'घरी', 'आहे,', 'तो', 'नंतर', 'बाहेर', 'जाईल']
>>> म.तोड(',')
['शरद घरी आहे', ' तो नंतर बाहेर जाईल']

ओळी()

दिलेला मजकूर विविध ओळींमध्ये भागणे.

>>> म = "पहिली ओळ \n दुसरी ओळ \n तिसरी ओळ"
>>> म.ओळी()
['पहिली ओळ ', ' दुसरी ओळ ', ' तिसरी ओळ']

शून्यभरणी (हद्द)

दिलेल्या शब्दमाळेची लांबी हद्दीला पोहोचेपर्यंत डावीकडे शून्य भरणे.

>>> क = माळ(123)
>>> क.शून्यभरणी(6)
'000123'

आयोजन असलेले वस्तूप्रकार - कोश

कोशांना आयोजित वस्तूप्रकार म्हणतात कारण इथे सर्व मूल्य तसेच सर्व माहिती ही व्यवस्थित आयोजित केलेली असते. कोशांमध्ये माहिती ही चावी आणि मूल्य यांची जोडी करून लिहिली जाते. कोशांच्या पुढील अंतर्गत क्रिया वापरल्या जातात.

चाव्या ()

ही क्रिया वापरून कोशातील सर्व चाव्यांची एक यादी तयार करता येते.

>>> को = {'अ' : 1, 'ब' : 2, 'स' : 3}
>>> यादी(को.चाव्या())
['अ', 'ब', 'स']

शेवटवजा ()

ही क्रिया वापरून कोशातील शेवटची चावी मूल्य जोडी वजा करता येते.

>>> को = {'अ' : 1, 'ब' : 2, 'स' : 3}
>>> को
{'अ': 1, 'ब': 2, 'स': 3}
>>> को.शेवटवजा()
('स', 3)
>>> को
{'अ': 1, 'ब': 2}

संचांवर आधारित वस्तूप्रकार - संच

संच हा वस्तूप्रकार वापरून गणितातून माहीत असलेल्या संचांवरील क्रिया करणे सोपे जाते. या वस्तूप्रकाराच्या अंतर्गत क्रिया पुढीलप्रमाणे आहेत.

आहेविभिन्न (क)

ही क्रिया वापरून दोन संच विभिन्न आहेत का हे तपासता येते.

>>> क = {1,2,3}
>>> ख = {1,2,3}
>>> क.आहेविभिन्न(ख)
असत्य
>>> ग = {4,5,6}
>>> क.आहेविभिन्न(ग)
सत्य

आहेउपसंच (क)

ही क्रिया वापरून दिलेला संच हा मुख्य संचाचा उपसंच आहे का हे तपासता येते.

>>> क = {1,2,3}
>>> ख = {1,2,3,4,5}
>>> ख.आहेउपसंच(क)
असत्य
>>> क.आहेउपसंच(ख)
सत्य

आहेविश्वसंच (क)

ही क्रिया वापरून मुख्य संच हा दिलेल्या संचाचा विश्वसंच आहे का हे तपासता येते.

>>> क = {1,2,3}
>>> ख = {1,2,3,4,5}
>>> ख.आहेविश्वसंच(क)
सत्य

युती (क)

ही क्रिया वापरून दोन किंवा अधिक संचांची युती करता येतो.

>>> क = {1,2,3}
>>> ग = {4,5,6}
>>> क.युती(ग)
{1, 2, 3, 4, 5, 6}
>>> ख = {7,8}
>>> प = {9,10}
>>> ग.युती(ख, प)
{4, 5, 6, 7, 8, 9, 10}

छेद (क)

ही क्रिया वापरून दोन संचांचा छेद काढता येतो.

>>> ख = {1,2,3,4,5}
>>> घ = {4,5,7,9}
>>> ख.छेद(घ)
{4, 5}

फरक (क)

ही क्रिया वापरून एक नवीन संच तयार करता येतो. या संचात तेच घटक असतात जे मुख्य संचात आहेत पण दिलेल्या संचात नाही आहेत.

>>> ख = {1,2,3,4,5}
>>> घ = {4,5,7,9}
>>> ख.फरक(घ)
{1, 2, 3}

समानफरक (क)

ही क्रिया वापरून एक नवीन संच तयार करता येतो. या संचात फक्त ते घटक असतात जे फक्त पहिल्या किंवा फक्त दुसऱ्या संचात आहेत.

>>> ख = {1,2,3,4,5}
>>> घ = {4,5,7,9}
>>> ख.समानफरक(घ)
{1, 2, 3, 7, 9}